देशात कोरोना रुग्णांचा आकडा 70 लाखांच्या पार, 24 तासात आढळले 74 हजारहून अधिक रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात गेल्या 24 तासात 74 हजारहून अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 70 लाखांच्या वर गेली आहे.


गेल्या 24 तासात कोरोनाचे 74 हजार 383 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या 70 लाख 53 हजार 807 वर पोहोचले आहे. गेल्या 24 तासात 918 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 1 लाख 8 हजार 334 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 60 लाख 77 हजार 977 रुग्ण बरे झाले असून 8 लाख 67 हजार 496 रुग्णांवर उपचार सुरू आहे.