
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, हिंदुस्थानात गेल्या 24 तासांत 5,880 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे सक्रिय रुग्णसंख्या 35,199 वर पोहोचली आहे. तर दरदिवसाचा पॉझिटिव्हिटी दर 6.91 टक्के आहे तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर 3.67 टक्के आहे.
एकूण 44,196,318 लोक या आजारातून बरे झाले आहेत. त्यामुळे या आजारातून मुक्त होण्याचा दर 98.74 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, 14 मृत्यूची नोंद झाली असून, मृतांची संख्या 53,09,79 वर पोहोचली आहे.
गेल्या 24 तासात लसीचे एकूण 205 डोस देण्यात आले. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 220,66,23,527 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.
आदल्या दिवशी झालेल्या एकूण चाचण्यांची संख्या ८५,०७६ होती.
उत्तर प्रदेशातील इमर्जन्सी वॉर्डातील रुग्णांसाठी कोविड चाचण्या सुरू
उत्तर प्रदेशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिएक्शन (RT-PCR) आणि बाह्यरुग्ण विभागातील रूग्णांसह आपत्कालीन वॉर्डातील रूग्णांसाठी चाचण्या करण्याचे आदेश दिले आहेत.

























































