पाकड्यांनी नऊ महिन्यांत केले 2317 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन

246

दहशतवादाला खतपाणी घालणाऱया पाकिस्तानने यंदा 10 ऑक्टोबरपर्यंत 2317 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, तर एलओसी आणि कश्मीरातील सुरक्षा यंत्रणांनी 147 दहशतवाद्यांचा खात्मा करून त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. जनरल ऑफिसर कमांडर इन चीफ (नॉर्थर्न कमांड) लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

दहशतवाद्यांना जम्मू-कश्मीरात शस्त्र्ाs सापडत नाहीत म्हणून ते पोलीस स्टेशन किंवा विशेष पोलीस अधिकाऱयांवर हल्ला करून त्यांच्याकडील शस्त्र हिसकावताहेत. सीमेबाहेर जवळपास 500 दहशतवाद्यांना हल्ल्याचे धडे दिले जाताहेत. हिंदुस्थानचे लष्कर पाकडय़ांचे कट उधळण्यासाठी सक्षम आहे असे सिंग म्हणाले.

हिंदुस्थानचा जवान गोळीबारात शहीद

पाकिस्तानने नौशेरा सेक्टरमध्ये केलेल्या गोळीबारात हिंदुस्थानी लष्कराचा जवान शुक्रवारी शहीद झाला. गोळीबारात जखमी झालेले नायक सुभाष थापा यांना उधमपूरच्या रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, पाकिस्तान ड्रोनच्या माध्यमातून हिमाचल प्रदेशमध्ये शस्त्र्ाs पाठवण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी पठाणकोट पोलिसांनी पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये ‘सर्च ऑपरेशन’ राबवले.

आपली प्रतिक्रिया द्या