टी-20 क्रिकेट विश्वचषकाची घोषणा

71

सामना प्रतिनिधी । सिडनी

ऑस्ट्रेलियामध्ये पुढील वर्षी 2020 मध्ये होणार्‍या टी-20 क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. विश्वचषकांमध्ये 12 संघांचा सहभाग असणार आहे. टी-20 क्रमवारीतील अव्वल आठ संघांना सरळ प्रवेश देण्यात आला आहे. इतर चार संघ पात्रता फेरी खेळून येतील. यामध्ये बांगलादेश आणि श्रीलंका या संघांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियात रंगणारी ही टी-20 स्पर्धा 24 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2020 या कालावधीत पार पडणार आहे.

टी-20 विश्वचषकासाठीच्या सुपर 12 साठी पात्र ठरलेल्या संघांची नावे आयसीसीने यापूर्वीच जाहीर केली आहेत. यामध्ये हिंदुस्थान, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज आणि अफगाणिस्तान संघांचा समावेश आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान संघांना वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवले आहे. त्यामुळे साखळी फेरीत दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार नाही. मात्र उपांत्य अथवा अंतिम सामन्यात त्यांच्यात लढत रंगते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या