पूर्ण देश हिंदुस्थानी सैन्याच्या पाठिशी खंबीरपणे उभा! उद्योगपतींनी केले जवानांचे कौतुक

पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील तणाव शिगेला पोहोचला आहे. हिंदुस्थानने मंगळवारी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकड्यांची झोप उडवली. त्यामुळे पाकिस्तानकडून हिंदुस्थानच्या सीमावर्ती शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पाकड्यांचा हा डाव उद्ध्वस्त करून हिंदुस्थानी सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. ऑपरेशन सिंदूरनंतर, या हल्ल्याच्या प्रयत्नाला प्रत्युत्तर देत हिंदुस्थानी नौदलाने कराची बंदर देखील उद्ध्वस्त केले. त्यामुळे हिंदुस्थानच्या या बुलंद कामगिरीला देशभरातून पाठिंबा दिला जात आहे. दरम्यान, हिंदुस्थानी उद्योगपतींनी लष्कराच्या दमदार कामगिरीचे कौतुक केले आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सैन्याच्या कामगिरीला सलाम केला आहे. “ऑपरेशन सिंदूरसाठी आम्हाला आमच्या हिंदुस्थानी सशस्त्र दलांचा अभिमान आहे. हिंदुस्थान कायमच एकजूट आहे. त्यांनी जवानांच्या दृढनिश्चयायाचे कोतुक केले  आहे. त्यामुळे कोणत्याही कठीण परिस्थितीत आपले सैन्य दहशतवादाविरुद्ध लढण्यास सज्ज आहे. हिंदुस्थान दहशतवादाच्या समोर कधीही गप्प राहणार नाही. आम्ही आमच्या भूमीवर, आमच्या नागरिकांवर किंवा आमच्या राष्ट्राचे रक्षण करणाऱ्या शूर जवानांनी देशवासियांवर कोणताही हल्ला सहन करणार नाही, हे आमच्या सैन्याने गेल्या काही दिवसांनी हे स्पष्ट केले आहे, असे ते यावेळी म्हणाले.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ट्वीटरवर एक पोस्ट शेअर करत हिंदुस्थानी सैन्याला पाठिंबा दिला आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान हिंदुस्थानी सशस्त्र दलांच्या शौऱ्याबद्दल आम्ही महिंद्रा ग्रुपतर्फे त्यांचे कौतुक करतो. ऑपरेशन सिंदूर द्वारे हिंदुस्थाने एक स्पष्ट संदेश दिला आहे. आपला देश आपल्या भूमीवर कोणताही दहशतवाद सहन करणार नाही किंवा आपल्या लोकांविरुद्ध कोणताही हल्ला सहन करणार नाही. ऑपरेशन सिंदूर हे हिंदुस्थानच्या सामर्थ्याचे, सार्वभौमत्वाचे प्रतिक आहे. असे आनंद महिंद्रा यांनी म्हंटले आहे.

उद्योगपती गौतम अदानी यांनीही हिंदुस्थानी सैन्याच्या कृतीचे कौतुक केले आहे. सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण जगाला हिंदुस्थानची खरी ताकद आणि एकता दिसून आली आहे. आम्ही सगळे एकजुटीने सैन्याच्या पाठिशी उभे आहोत. असे गौतम अदानी यावेळी म्हणाली.