पेट्रोल 12 तर डिझेल 16 पैशांनी स्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेले तीन दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात सुरू असून आज चौथ्या दिवशीही पेट्रोलच्या दरात 12 आणि डिझेलच्या दरात 16 पैशांची कपात करण्यात आली. त्यामुळे गेल्या चार दिवसांत पेट्रोल 72 पैशांनी तर डिझेल 46 पैशांनी स्वस्त झाले आहे. तेल वितरण कंपन्यांनी केलेल्या कपातीमुळे इंधन दरवाढीमुळे वैतागलेल्या वाहनचालकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल 79 रुपये 50 पैसे तर डिझेल 70 रुपये 27 पैशाला मिळत आहे.