हिंदुस्थानचे पहिले स्थान कायम, आयसीसी कसोटी रँकिंग

हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यामध्ये या वर्षी 18 जूनपासून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या कसोटी लढतीनंतर कसोटीतील जगज्जेता संघ ठरणार आहे. पण त्याआधी आयसीसीकडून गुरुवारी कसोटी रँकिंगची घोषणा करण्यात आली. विराट कोहलीच्या ब्रिगेडने कसोटी रँकिंगमधील आपले स्थान कायम राखले आहे.

केन विल्यमसनचा न्यूझीलंड संघ दुसऱया स्थानावर आहे. याच दोन संघांमध्ये कसोटी जागतिक चॅम्पियनशिपची अंतिम लढत होणार आहे. याप्रसंगी हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यामध्ये कोणता संघ वर्ल्ड चॅम्पियन होतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे.

विराट पाचव्या अन् रिषभ सहाव्या स्थानावर

आयसीसीच्या कसोटी क्रिकेटमधील फलंदाजांच्या रँकिंगमधील अक्वल पाचमध्ये हिंदुस्थानचा एकच खेळाडू आहे. कर्णधार विराट कोहली हा पाचव्या स्थानावर विराजमान आहे. गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखदार कामगिरी करणारा हिंदुस्थानचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत याने सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. रोहीत शर्मा आठव्या स्थानावर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या