
हिंदुस्थान-रशिया संबंध आणि अमेरिकेच्या अलिकडच्या टिप्पण्यांबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर हिंदुस्थानची भूमिका स्पष्ट केली. ज्यात हिंदुस्थानी कंपन्यांवर अमेरिकेने लादलेले निर्बंध, रशियाकडून तेल खरेदी, हिंदुस्थान-अमेरिका संबंध इत्यादींचा समावेश आहे.
एक दिवस हिंदुस्थान पाकिस्तानकडून तेल खरेदी करू शकतो, या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर परराष्ट्र मंत्रालयाने कोणतीही थेट टिप्पणी केलेली नाही. मात्र रणधीर जयस्वाल म्हणाले की, “हिंदुस्थान कोणत्याही देशाशी त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर संबंध निर्माण करतो. आमचे संबंध कोणत्याही तिसऱ्या देशाच्या विचारांवर अवलंबून नाहीत.” ते पुढे म्हणाले की, हिंदुस्थान आणि रशियाची दीर्घकाळापासून स्थिर आणि विश्वासार्ह भागीदारी आहे, जी काळाच्या कसोटीवर खरी उतरली आहे. इराणसोबत व्यवसाय केल्याबद्दल अमेरिकेने काही हिंदुस्थानी कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. यावर परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही या निर्बंधांची नोंद घेतली आहे आणि त्याकडे लक्ष देत आहोत.”
हिंदुस्थान आणि अमेरिकेच्या संबंधांवर बोलताना रणधीर जयस्वाल म्हणाले की, “हिंदुस्थान आणि अमेरिकेची मजबूत धोरणात्मक भागीदारी आहे. ही भागीदारी सामायिक हितसंबंधांवर, लोकशाही मूल्यांवर आणि लोकांमधील खोल संबंधांवर आधारित आहे.” ते म्हणाले, “काळानुसार हे नाते अधिक मजबूत झाले आहे आणि आम्हाला विश्वास आहे की ते पुढेही प्रगती करत राहील.”
काही माध्यमांच्या वृत्तानुसार, हिंदुस्थानी कंपन्यांनी रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले आहे, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. यावर उत्तर देताना रणधीर जायसवाल म्हणाले की, “आम्ही आमच्या ऊर्जेच्या गरजा लक्षात घेऊन निर्णय घेतो. बाजारातील परिस्थिती आणि पर्याय पाहून निर्णय घेतला जातो. या संदर्भात कोणतीही विशिष्ट माहिती नाही.”
#WATCH दिल्ली | विदेश मंत्रालय के प्रवक्ता रणधीर जायसवाल ने कहा, “किसी भी देश के साथ हमारे संबंध उसकी योग्यता पर आधारित हैं और उन्हें किसी तीसरे देश के चश्मे से नहीं देखा जाना चाहिए। जहां तक भारत-रूस संबंधों का सवाल है, हमारे बीच एक स्थिर और समय-परीक्षित साझेदारी है।” pic.twitter.com/VooIBysLZi
— ANI_HindiNews (@AHindinews) August 1, 2025