हिंदुस्थानला रशियन लस मिळणार, ‘स्पुटनिक व्ही’ला तातडीने मंजुरी

कोरोना लढय़ात हिंदुस्थानला लवकरच रशियन लस मिळणार आहे. विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने ‘स्पुटनिक व्ही’ लसीला तातडीने मंजुरी दिली आहे. ही लस कोरोना संसर्ग रोखण्यात 92 टक्के परिणामकारक आहे. हैदराबादेतील डॉ. रेड्डीज लॅबमार्फत या लसीची निर्मिती आणि वितरण केले जाणार आहे.

डॉ. रेड्डीज लॅबने ‘स्पुटनिक व्ही’ लस देशात आणण्यासाठी ‘रशिया डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड’शी करार केला आहे. ‘स्पुटनिक व्ही’ ही मॉडर्ना आणि फायजरनंतरची सर्वाधिक प्रभावकारी लस आहे. सोमवारी हिंदुस्थानी औषध नियामकच्या तज्ञ समितीची बैठक झाली. या बैठकीत ‘स्पुटनिक व्ही’ला आपत्कालीन मंजुरी देण्यात आली. देशात सध्या सिरम इन्स्टिटय़ूटची कोविशिल्ड व भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस टोचली जात आहे. ‘स्पुटनिक व्ही’ लस देशाच्या लसीकरण मोहिमेत गेमचेंजर ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या