हिंदुस्थानातील श्रीमंतांची संख्या २० टक्क्यांनी वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

जीएसटी लागू होऊनही  हिंदुुस्थानातील श्रीमंतांची संख्या २० टक्क्यांनी म्हणजेच २ लाख ६३ हजारांनी वाढली आहे. त्यांच्या एकूण संपत्तीत एक ट्रिलियन डॉलर्सपेक्षा अधिकची भर पडली आहे. फ्रेंच टेक फर्म कॅपगेमिनीने हा अहवाल दिला आहे. हिंदुस्थान ही मोठी जागतिक बाजारपेठ असल्याचेही कंपनीनेही म्हटले आहे.

अमेरिका, जपान, जर्मनी आणि चीन ही राष्ट्रे म्हणजे एक मिलियन डॉलर्सपेक्षा मोठ्या गुंतवणुकीची मार्केट बनली आहेत. या यादीत हिंदुस्थानी बाजारपेठेनेही ११ वे स्थान मिळवले आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात लागू झालेल्या वस्तू आणि सेवा करामुळे हिंदुस्थानींच्या संपत्तीवर प्रतिकूल परिणाम होईल, अशी अपेक्षा होती. मात्र उलटा परिणाम झालेला दिसत आहे. नोटबंदीचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. हिंदुस्थानींचा बचतीचा चढता आलेखही दिसून येत असल्याची निरीक्षणे आहेत.

वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरमचा वार्षिक अहवाल काही महिन्यांपूर्वीच प्रसिद्ध झाला आहे. त्या अहवालानुसार आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील ६७ कोटी हिंदुस्थानींच्या संपत्तीत एक टक्क्याने वाढ झाली आहे.