डबल मजा…

1170

पहिला दिवस मुंबईकर रोहीत शर्माने दमदार शतक करून गाजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा जोडीदार मयांक अग्रवालने द्विशतकी धमाका करीत दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्याने 371 चेंडूंत सहा षटकार व 23 चौकारांसह 215 धावांची खणखणीत खेळी साकारली. रोहीत शर्मा (177 धावा) व मयांक अग्रवालच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर हिंदुस्थानने पहिल्या डावात 7 बाद 502 धावा फटकावल्या.

पहिल्याच कसोटी शतकाचे द्विशतकात रूपांतर करणारा मयांक हा हिंदुस्थानचा चौथा फलंदाज ठरलाय. याआधी दिलीप सरदेसाई, विनोद कांबळी व करुण नायर या हिंदुस्थानी फलंदाजांनी पहिल्या कसोटी शतकाचे द्विशतकात रूपांतर केले होते.

 

आपली प्रतिक्रिया द्या