हिंदुस्थानी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pakistan-missile

जमिनीवरून हवेत शत्रूवर थेट भेदक हल्ला करणाऱया क्षेपणास्त्र हवाई संरक्षण प्रणालीची हिंदुस्थानने रविवारी यशस्वी चाचणी केली. ओडिशातील बालासोरच्या किनाऱयावर ही चाचणी करण्यात आली. यावेळी मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राने लांब अंतरावरून टार्गेटवर अचूक हल्ला केला.

रविवारी सकाळी 10.30 च्या सुमारास ‘मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल’ (एमआरएसएएम) प्रणालीची चाचणी यशस्वी झाली. हे क्षेपणास्त्र 70 किलोमीटरच्या कक्षेत येणारे कोणत्याही शत्रूचे क्षेपणास्त्र किंवा लढाऊ विमान पाडण्यास पूर्णपणे सक्षम आहे. रविवारी एमआरएसएएम प्रणालीतून झेपावलेल्या क्षेपणास्त्राने दूर अंतरावर निश्चित केलेले प्रचंड वेगाचे हवाई टार्गेट थेट हल्ला करीत नष्ट केले. एमआरएसएएम ही क्षेपणास्त्र्ा प्रणाली इस्रायलच्या मदतीने डीआरडीएल हैदराबाद आणि डीआरडीओने संयुक्तपणे बनवली आहे.