सूर्यकुमार यादवची जर्मनीत स्पोर्टस् हर्निया शस्त्रक्रिया यशस्वी

हिंदुस्थानी टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवची जर्मनीमध्ये स्पोर्टस् हर्निया शस्त्रक्रिया झाली. 34 वर्षीय सूर्यकुमारने सोशल मीडियावर त्याचा शस्त्रक्रिकेनंतरचा फोटो शेअर करून आपल्या आरोग्याची माहिती दिली.

रोहित शर्मानंतर बीसीसीआयने टी-20 संघाची कमान त्याच्याकडे सोपवली आहे. शस्त्रक्रियेमुळे तो बांगलादेश दौऱयावर जाण्याची शक्यता कमी आहे. त्याला पूर्णपणे बरा होण्यासाठी 6 ते 12 आठवडे लागतील. पुढील वर्षी हिंदुस्थान आणि श्रीलंकेत होणाऱया टी-20 विश्वचषक 2026 मध्ये सूर्यकुमार यादव टीम इंडियाचे नेतृत्व करेल. सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावर लिहिले की, ‘लाइफ अपडेट, पोटाच्या खालच्या उजव्या भागात स्पोर्टस् हर्नियाची शस्त्रक्रिया झाली. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर मला आता बरे वाटत आहे. क्रिकेटच्या मैदानावर परतण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे.’ याचा अर्थ तो लवकरच क्रिकेटच्या मैदानावर परतेल. सूर्या हा हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे.