
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराची घोषणा केली. त्याचे जगभरात परिणाम दिसून येत आहे. तसेच ट्रम्प यांच्या घोषणेनंतर रात्रीच गिफ्ट निफअटीमध्ये तब्बल एक हजार रुपयांची वाढ दिसून आली. तसेच मंगळवारी शेअर बाजार मजबूतीसह सुरू झाला आणि बाजारात तेजी दिसून आली. तसेच सोन्या-चांदीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच अनेक महिन्यांपासून दबावात असलेला रुपयाही वधारला आहे. ट्रम्प यांच्या एका घोषणेचे जगभरात परिणाम होत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री हिंदुस्थानसोबत व्यापार कराराची घोषणा केली. त्यांनी हिंदुस्थानवरील कर १८ टक्क्यांपर्यंत कमी केल्याची घोषणा केली. या मोठ्या घोषणेनंतर शेअर बाजार जबरदस्त तेजीत आला आहे. या तेजीने गुंतवणूकदारांची संपत्तीत अंदाजे २० लाख कोटींनी वाढली आहे. सोने आणि चांदीच्या किमतींमध्येही मोठी वाढ दिसून आली आहे.
याचा परिणाम भारतीय चलन असलेल्या रुपयावरही झाला आहे. रुपयाही वेगाने वाढला आणि ९० रुपयांच्या जवळ व्यवहार करत आहे. सोमवारी ९१.५१ वर बंद झाल्यानंतर मंगळवारी भारतीय रुपया ११२ पैशांनी वाढून ९०.३९ वर उघडला. हिंदुस्थान-अमेरिका व्यापार कराराच्या घोषणेनंतर चलनात सकारात्मकता आली आहे. रुपयासाठी हा एका दिवसातील सर्वात मोठी वाढ आहे, सध्याच्या जागतिक घडामोडी आणि टॅरिफबाबतची महत्त्वाची घोषणा यामुळे रुपया आणखी वधारेल अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सोमवारी, रुपया ४२ पैशांनी वधारून ९१.५१ वर बंद झाला. आजच्या वाढीमुळे रुपयाची वर्षभरातील घसरण कमी झाली आहे. २०२६ मध्ये भारतीय चलन फक्त ०.५६% घसरले आहे आणि एकाच वर्षात ४.५५% घसरले आहे. भारतीय रुपयात उल्लेखनीय वाढ झाल्याने शेअर बाजारातही तेजी आहे. बीएसईच्या सर्व टॉप ३० शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून येत आहे. अदानी पोर्ट्समध्ये ७% वाढ झाली आहे, ज्यामुळे त्यांचे व्यवहार १,५०० च्या वर गेले आहेत. त्यानंतर, इंडिगो, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह आणि सन फार्मा सारख्या शेअर्समध्येही जोरदार तेजी दिसून आली आहे.
वायदे बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीतही लक्षणीय वाढ दिसून आली आहे. सोने ५,००० ने वाढून १.४९ लाखांच्या वर गेले आहे. चांदीच्या किमती १६,००० ने वाढल्या आहेत आणि सध्या २.५२ लाखांच्या वर व्यवहार करत आहेत. तांबे आणि इतर धातूंमध्येही जोरदार वाढ दिसून येत आहे.

























































