टीम इंडियाला आघाडीची संधी, ऑस्ट्रेलिया 7 बाद 191 धावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

हिंदुस्थानी संघाचा पहिला डाव 250 धावांवर रोखल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचे दुसऱ्या दिवस अखेर सात फलंदाज तंबूत परतले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 7 विकेटच्या मोबदल्यात 191 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा संघ अद्यापही 59 धावांनी पिछाडीवर असून तिसऱ्या दिवशी शेपूट लवकर गुंडाळून आघाडी घेण्याची संधी टीम इंडियाकडे आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी टीम इंडियाचा डाव 250 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. इशांत शर्माच्या इनस्विंगवर फिंच शून्यावर बाद झाला. या धक्क्यातून ऑस्ट्रेलियाला सावरता आले नाही. त्यांचे सहा फलंदाज 127 धावात बाद झाले. त्यानंतर हेड आणि कमिन्सने पन्नास धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दुसऱा दिवस संपण्यात थोडाच अवधी बाकी असताना कमिन्स 10 धावांवर बाद झाला. हेडने एक बाजू लावून घरली असून तो 61 धावांवर नाबाद आहे, त्याला स्टार्क 8 धावांवर साथ देत आहे. टीम इंडियाकडून अश्विनने 3, इशांत शर्मा आणि बुमराहने प्रत्येकी 2 बळी घेतले.