#INDvWI – हेटमायर, होपचा शतकी तडाखा; पहिल्या वन डेमध्ये हिंदुस्थानचा पराभव

1694

चेन्नईत झालेल्या एक दिवसीय लढतीत पाहुण्या वेस्ट इंडीजने यजमान हिंदुस्थानचा 8 विकेट्सने पराभव केला. या विजयासह विंडीजने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. विंडीजच्या विजयामध्ये शिमरॉन हेटमायर याने (139) आणि शाई होपने (नाबाद 102) धावांचे योगदान दिले.

तत्पूर्वी टीम इंडियाने वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी 288 धावांचे आव्हान ठेवले. ऋषभ पंत (70), श्रेयस अय्यर (71) आणि केदार जाधव (40) यांच्या फटकेबाजीमुळे टीम इंडियाने 50 षटकात 8 बाद 287 धावा केल्या. विंडीजकडून पॉल, कॉटरेल, जोसेफने प्रत्येकी 2 आणि पोलार्डने एक विकेट घेतली.

 • विंडीजचा विजय, 47.5 षटकात गाठले लक्ष्य

 • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आठवे वन डे शतक
 • होपचे शतक, विंडीज विजयानजीक
 • शेवटच्या 60 चेंडूत 56 धावांची आवश्यकता
 • 40 षटकानंतर 2 बाद 232 धावा
 • बाद होण्यापूर्वी 106 चेंडूत 139 धावा चोपल्या
 • विंडीजला दुसरा धक्का, शतकानंतर हेटमायर बाद

 • विंडीजच्या 200 धावा पूर्ण
 • 35 षटकानंतर 1 बाद 191 धावा
 • 85 चेंडूत झळकावले शतक
 • शिमरॉन हेटमायरचे शतक

 • 30 षटकानंतर 1 बाद 161 धावा
 • शाई होपचे अर्धशतक, विंडीज मजबूत स्थितीत
 • 28 षटकानंतर 1 बाद 154 धावा
 • विंडीजच्या 150 धावा पूर्ण
 • 25 षटकानंतर 1 बाद 136 धावा
 • 22 षटकानंतर 1 बाद 113 धावा
 • विंडीजच्या 100 धावा पूर्ण
 • हेटमायरचे अर्धशतक

 • होप-हेटमायरची फटकेबाजी, विंडीज लक्ष्याकडे आगेकूच
 • 15 षटकानंतर विंडीजच्या 1 बाद 79 धावा
 • विंडीजच्या 50 धावा पूर्ण
 • पाच षटकानंतर 1 बाद 12 धावा
 • चहरने केले 9 धावांवर बाद
 • विंडीजला पहिला धक्का, आब्रिस बाद

 • दोन षटकानंतर विंडीजच्या बिनबाद 8 धावा
 • वेस्ट इंडीजची फलंदाजी सुरू, आब्रिस आणि होप मैदानात
 • टीम इंडियाचे विंडीजपुढे 288 धावांचे आव्हान

 • जाडेजा 21 धावांवर धावबाद
 • केदार जाधव 40 धावा काढून बाद
 • टीम इंडियाला सहावा धक्का
 • जाडेजा-जाधवमध्ये 50 धावांची भागिदारी
 • 46 षटकानंतर हिंदुस्थानच्या 5 बाद 260 धावा
 • टीम इंडियाच्या 250 धावा पूर्ण, पाच षटकांचा खेळ बाकी
 • 44 षटकानंतर हिंदुस्थानच्या 5 बाद 245 धावा
 • 40 षटकानंतर हिंदुस्थानच्या 5 बाद 216 धावा
 • बाद होण्यापूर्वी केल्या 71 धावा
 • टीम इंडियाला मोठा धक्का, विस्फोटक पंत बाद
 • टीम इंडियाच्या 200 धावा पूर्ण
 • 38 षटकानंतर हिंदुस्थानच्या 4 बाद 199 धावा
 • बाद होण्यापूर्वी 88 चेंडूत केल्या 70 धावा
 • टीम इंडियाला चौथा धक्का, अर्धशतकानंतर अय्यर बाद

 • 35 षटकानंतर हिंदुस्थानच्या 3 बाद 185 धावा
 • एक दिवसीय कारकीर्दीतील पहिले अर्धशतक
 • श्रेयसपाठोपाठ पंतचे अर्धशतक

 • एक दिवसीय कारकीर्दीतील पाचवे अर्धशतक
 • श्रेयस अय्यरचे अर्धशतक

 • टीम इंडियाच्या 150 धावा
 • 30 षटकानंतर हिंदुस्थानच्या 3 बाद 137 धावा
 • पंत-श्रेयसची 50 धावांची भागिदारी

 • टीम इंडियाच्या 100 धावा
 • 22 ष़टकात टीम इंडियाच्या 88 धावा
 • रिषभ पंत मैदानावर
 • टीम इंडियाला तिसरा धक्का, रोहीत 36 धावा करून बाद
 • टीम इंडियाच्या 50 धावा पूर्ण
 • टीम इंडियाची खराब सुरुवात, दहा षटकात अवघ्या 33 धावा
 • टीम इंडियाला दुसरा धक्का, कोहली बाद
 • लोकेश राहुल बाद, हिंदुस्थानला पहिला धक्का
 • पाच षटकाअखेर टीम इंडियाच्या 18धावा
 • तीन षटका अखेर टीम इंडियाच्या 5 धावा
 • दोन षटकात टीम इंडियाच्या 5 धावा
 • टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरुवात, रोहित शर्मा व लोकेश राहुल मैदानावर
 • टीम इंडियात शिवम दुबेला स्थान, आज खेळणार पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना

 •  नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा गोलंदाजीचा निर्णय

आपली प्रतिक्रिया द्या