टीम इंडियाचं विश्वचषकाचा प्रमुख दावेदार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून स्तुती 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोलकाता 

आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हिंदुस्थानी क्रिकेट संघच विश्वचषकाचा प्रमुख दावेदार म्हणूनच मैदानात उतरेल. जागतिक स्तरावरील कोणत्याही खेळपट्टीवर टीम इंडियाविरुद्ध खेळणं अन्य संघांना आव्हानात्मकच आहे, अशा शब्दात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये दिग्विजयी वाटचाल करणाऱ्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी संघाची तोंडभरून स्तुती केली आहे.

गेल्या काही वर्षांतील हिंदुस्थानी संघांच्या कामगिरीचा आढावा घेतला तर हा संघ  चांगला समतोल आहे. टीम इंडियाने  दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघाविरुद्धच्या मालिका चांगल्या फरकाने जिंकल्या आहेत, असे गौरवोद्गार सचिननं काढले. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत हिंदुस्थानने मिळवलेल्या शानदार विजयाचे कौतुक करताना इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाला चांगली तयारी करावी लागेल, कारण इंग्लंडच्या भूमीत इंग्लंडही विश्वविजेतेपदाचा तगडा दावेदार ठरू शकतो,  असे मतही सचिनने व्यक्त केले.