
सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन
हिंदुस्थानी वायुसैन्याला आज एक नवं अस्त्र मिळालं आहे. लादेन किलर अशी ओळख असलेलं AH-64E अपाचे अटॅक हेलिकॉप्टर शनिवारी वायुसेनेत दाखल झालं. अत्याधुनिक आणि सर्वात घातक मानलं जाणारं हे हेलिकॉप्टर अमेरिकन बनावटीचं असून बोईंग या कंपनीने त्याची निर्मिती केली आहे.
Indian Air Force receives its first Apache Guardian attack helicopter at its production facility in Arizona, in the US. India has signed a contract with the US, for 22 of these choppers. pic.twitter.com/YjJmVcpqqk
— ANI (@ANI) May 11, 2019
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हिंदुस्थान आणि अमेरिकेत 22 अपाचे हेलिकॉप्टर खरेदी संबंधी व्यवहार झाला आहे. अपाचेच्या दाखल होण्याने वायुसैन्याची ताकद अजून वाढली आहे. यापूर्वी वायुसेनेकडे रशियन बनावटीचं एमआय-35 हे हेलिकॉप्टर होतं. मात्र, आता कालपरत्वे ते निवृत्त होत आहे. त्यामुळे आता ही नवीन, जास्त ताकदीची हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यात आली आहेत. अपाचेची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की, शत्रुच्या तटबंदीला भेदून त्याच्या सीमेत घुसत त्याच्यावर हल्ला करता करता यावा. युद्धाच्या वेळी अपाचे गेमचेंजरची भूमिका पार पाडेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. कारण, अमेरिकेने 2011मध्ये हेच हेलिकॉप्टर पाकिस्तानात घुसवून ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता आणि पाकिस्तानला त्याचा पत्ताही लागला नव्हता. त्यानंतरच या हेलिकॉप्टरला लादेन किलर म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
ही आहेत अपाचेची वैशिष्ट्य
१. अपाचे हे multi tasking करू शकतं. यात दोन जनरल इलेक्ट्रिक T700 टर्बोशॅफ्ट इंजिन बसवण्यात आली आहेत. हेलिकॉप्टरच्या दर्शनी भागात एक सेन्सर बसवण्यात आला आहे. या सेन्सरमुळे रात्रीच्या अंधारातही ते उड्डाण करू शकतं.
२. याचा वेग ताशी 365 किलोमीटर असून या वेगामुळेच शत्रुच्या रणगाड्यांच्या चिंधड्या करून क्षणात निघून जाऊ शकतं.
३. या हेलिकॉप्टरमध्ये हेलिफायर आणि स्ट्रिंगर अशा दोन्ही पद्धतीची क्षेपणास्त्रं आहेत.
४. या हेलिकॉप्टरचं वजन 5,165 किलो इतकं आहे. पण, याची रचना अशा प्रकारे केली गेली आहे जेणेकरून कोणत्याही युद्धपरिस्थितीत ते टिकून राहू शकेल.
५. यातील सर्वात महत्त्वाचं फीचर म्हणजे हेल्मेट माउंटेड डिस्प्ले, इंटिग्रेटेड हेल्मेट आणि डिस्प्ले साइटिंग सिस्टिम या तंत्रज्ञानाच्या मदतीने हेलिकॉप्टरमधील पायलट स्वयंचलित गनच्या साहाय्याने शत्रुचा वेध घेऊ शकेल.
६. कोणतीही परिस्थिती, कोणताही ऋतू यात हे हेलिकॉप्टर शत्रुचा सहज नायनाट करू शकतं.
























































