
अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये हिंदुस्थानी आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाल्याची बातमी समोर आल्यापासून देशातील वातावरण तापले आहे. यावरून विरोधी पक्ष सरकारला घेराव घालत आहेत, चीनच्या कारवायांचे विश्लेषण देखील केले जात आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी सोशल मीडियावर 2.20 मिनिटांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. यात हिंदुस्थानी सैनिक चिनी सैनिकांची धुलाई करत आहेत. चिनी माकडांची धुलाई होत असल्याचे पाहून लोकांनी या व्हिडिओचा आनंद घेतला आहे.
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये चिनी सैनिकांना होत असलेली मारहाण पाहून सामान्य लोक खूश झाले आहेत. व्हिडिओमध्ये एक शीख सैनिक चिनी सैनिकांना त्याच्या शैलीत शिवीगाळ करताना दिसत आहे. अनेकांनी याचा आनंद घेतला आहे. यामध्ये पंजाबी समजण्यास फारशी अडचण येणार नाही, असे एकाने लिहिले आहे. तर काहीजणांनी ‘मी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहतोय. शत्रूला मारताना पाहण्याची मजा काही औरच असते. असे लिहिले.
9 डिसेंबर रोजी अरुणाचलमध्ये झालेल्या चकमकीची बातमी सोमवारी संध्याकाळी प्रसारमाध्यमांमध्ये चमकली. 24 तासांनंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत लोक हा व्हिडिओ व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करत होते.





























































