सीमेवरील चिनी माकडांवर हेरॉन ड्रोनचा ‘वॉच’, पूर्व लडाख प्रांतात करणार तैनाती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लडाख प्रांतातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) चिनी सैन्याच्या कारवायांवर हिंदुस्थानी लष्कर आता करडी नजर ठेवू शकणार आहे. लष्कराला इस्रायलमध्ये बनवलेले चार अत्याधुनिक हेरॉन ड्रोन मिळाले आहेत. हे ड्रोन पूर्व लडाख प्रांतात तैनात केले जाणार आहेत. या ड्रोनच्या सहाय्याने चिनी सैन्याच्या हालचालींवर पाळत ठेवून त्यांची कट-कारस्थाने वेळीच उधळून लावता येणार आहेत.

हेरॉन ड्रोन हे या श्रेणीतील आधीच्या ड्रोनपेक्षा कित्येक पटीने प्रभावी आहेत. या ड्रोनचे कॅमेरे, सेन्सर्स आणि रडार गरुडाच्या नजरेप्रमाणे तीक्ष्ण आहेत. अँटी-जॅमिंग क्षमतादेखील तुलनेने अधिक चांगली आहे, असा दावा लष्कर अधिकाऱयांनी केला आहे.

केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वीच सुरक्षा दलांना आवश्यकता भासेल, त्यावेळी आपत्कालीन खरेदी करण्याचे अधिकार दिले आहेत. त्याअंतर्गत चीनचा प्रतिकार करण्याच्या हेतूने लष्कराची युद्धक्षमता वाढवण्यासठी 500 कोटींपर्यंत शस्त्र्ासामग्री खरेदी केली जाऊ शकते. या अधिकाराचा वापर करून इस्रायलकडून अत्याधुनिक हेरॉन ड्रॉन मिळवले आहेत. या ड्रोनच्या मदतीने हिंदुस्थानी लष्कर आता चिनी सैन्याची पळता भुई थोडी करू शकणार आहे.

हेरॉन ड्रोनची क्षमता

इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीजच्या यूएव्ही डिव्हिजनने तयार केलेले हेरॉन ड्रोन हवेत 35 हजार फूट उंचीवर 52 तासांपर्यंत घिरटय़ा घालू शकतात.

30 हजार फूट उंचीवरूनही हे ड्रोन जमिनीवरील जवानांना फिडबॅक देऊ शकतील. त्याआधारे जवानांना पुढील रणनिती आखता येऊ शकेल.

फेब्रुवारी 2014 मध्ये सिंगापूर एअर शोमध्ये सुपर हेरॉन लॉन्च करण्यात आला होता. या ड्रोनमध्ये 200 हॉर्सपॉवरचे डिझेल इंजिन बसवण्यात आलेले आहे.