
भारतीय लष्कराने गुरुवारी दिल्ली छावणीतील माणेकशॉ सेंटरमध्ये ‘बॅटल ऑफ माइंड्स इंडियन आर्मी क्विझ 2023’चे आकर्षक लोगोसह अनावरण केले. कारगील विजय दिवस साजरा करण्यासाठी ही प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. यासाठी विनामूल्य नोंदणी व आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली.
या कार्यक्रमाला लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचिंद्र कुमार उपस्थित होते. प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या लोगोचे अनावरण एडब्ल्यूडब्ल्यूएच्या अध्यक्षा श्रीमती अर्चना पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. परमवीर चक्र पुरस्कार विजेते सुभेदार मेजर (मानद पॅप्टन), योगेंद्र सिंह यादव (निवृत्त) आणि सुभेदार मेजर संजय कुमार तसेच हिंदुस्थानातील 36 राज्ये व पेंद्रशासित प्रदेशांमधील शाळांच्या मुख्याध्यापकांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.
























































