
हिंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तानचे एक फायटर विमान पाडले आहे. हे विमान चीनने पाकिस्तानला भेट दिले होते. या विमानाचे नावर JF-17 असून चीन आणि पाकिस्ताने संयुक्तरित्या विकसित केले होते. 2003 साली याची पहिली चाचणी झाली होती आणि पाकिस्तानच्या हवाई दलाचे हे मुख्य फायटर विमान होते.
JF-17 विमानाची लांबी ही 14.9 मीटर, विंगस्पॅन 9.45 मीटर आणि रुंदी 4.77 मीटर इतकी आहे. याची टेकऑफची क्षमता ही 12 हजार 474 किलो इतकी आहे. या विमानात रशियन बनावटीच्या Klimov RD-93 किंवा चायनीज Guizhou WS-13 टर्बफॅन इंजिनचा समावेश आहे. याचा वेग हा ताशी 1910 किमी इतका आहे. हे विमान 7 हार्डपॉईंट्सवर दीड हजार किलोपर्यंतर हत्यार नेऊ शकतं. त्यात एअर टू एअर मिसाईल्स, एअर टू एअर ग्राऊंड बॉम्ब आणि अँटी शिप मिसाईल्सचा समावेश आहे. या हत्यारांमध्ये चायनीज बनावटीचे PL-5, PL-12, PL-15 मिसाईल्स आणि GPS Guided बॉम्बचाही समावेश आहे. हे मिसाईल्स हवेतून आणि जमिनीवरूनही डागता येतात.