
जम्मू कश्मीरमध्ये हिंदुस्थानी जवानांची एक गाडी 700 फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी याबाबात माहिती दिली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सैन्याचा एक ट्रक राष्ट्रीय महामार्ग 44वरून श्रीनगरला जात होता. चश्मा जवळ राष्ट्रीय महामार्ग 44वरील सकाळी साडे अकरा वाजता हा अपघात झाला. तेव्हा सैन्य, पोलीस आणि राज्य आपत्ती निवारण विभाग आणि स्थानिकांच्या मदतीने बचाव अभियान सुरू केले. या अपघातात तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. त्यात शिपाई अमित कुमार, सुजित कुमार आणि मान बहादूर यांचा समावेश आहे.
J&K : रामबन में सेना का ट्रक 600 मीटर नीचे खाई में गिरा, 3 जवानों की मौत हुई !! pic.twitter.com/aKUkzsqulb
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) May 4, 2025