इंडियन चार्ल्स शोभराज ‘सुपर नटवरलाल’चे निधन

चोरी, फसवणूक, बनवाबनवी करून देशभरात धुमाकूळ घालणारा ‘इंडियन चार्ल्स शोभराज’ किंवा ‘सुपर नटवरलाल’ म्हणून कुख्यात असलेल्या हरयाणाच्या धनीराम मित्तल याचे हृदयविकाराने निधन झाले. तो 85 वर्षांचा होता. उच्च शिक्षण घेऊनही धनीरामने चोरीचा मार्ग निवडला होता. त्याच्या कारनाम्यांमुळे सारेच चक्रावले होते.

धनीरामविरोधात फसवणुकीचे 150 हून अधिक गुन्हे दाखल होते. त्याने वकिलीची पदवी मिळवली होती. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने रेल्वेमध्ये नोकरी मिळवली होती. त्याने सहा वर्षे स्टेशन मास्तर म्हणून काम केले होते. तसेच बनावट पत्राच्या आधारे न्यायाधीशांची खुर्ची मिळवत 2270 आरोपींना जामीन मिळवून दिला होता.