
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. डोशेट यांनी गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील कोचिंग स्टाफमध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले. आपल्याला दिलेल्या आश्वासनाची पूर्ती न झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे आता म्हटले जात आहे. डोशेट यांना क्षेत्ररक्षण प्रशिक्षक पदाचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु टी. दिलीप यांचा करार वाढवण्यात आला आणि ते क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून कायम राहिले. यामुळे डोशेट सहाय्यक प्रशिक्षक बनले. आपली भूमिका मर्यादित असल्याने त्यांनी भारतीय संघ सोडण्याचा निर्णय घेतला.


























































