
सूर्यपुमार यादवने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्ससाठी खेळताना 145च्या सरासरीने 480 धावा फटकावल्या, मात्र तरीही त्याची ऑस्ट्रेलियन दौऱयासाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियाच्या चमूत निवड करण्यात आलेली नाही. वेस्ट इंडीजचा माजी दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा याने याबद्दल आपले मत व्यक्त करताना म्हटले की, सूर्यकुमार यादवला हिंदुस्थानी क्रिकेट संघात स्थान द्यायला हवे होते. त्याला टीम इंडियात न घेण्याचे कोणतेही कारण दिसत नाही.
ब्रायन लारा आयपीएल लढतींचे समालोचन करीत होता. सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीचे ब्रायन लाराने काैतुक केले. ब्रायन लारा पुढे म्हणाला, मी फक्त धावांवर लक्ष देत नाही. फलंदाजाचे तंत्र, दबावाखाली खेळण्याचे काwशल्य आणि तो कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करतो हे सर्व मी बघतो. सूर्यकुमार यादव सर्वच बाबतीत सरस ठरलाय. तो क्लास खेळाडू आहे. ब्रायन लारा पुढे नमूद करतो की, सलामी फलंदाज वगळता तिसऱया स्थानावर फलंदाजी करणारा खेळाडू हा सर्वोत्तम असतो. सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्ससाठी या क्रमांकावर फलंदाजी करीत सर्वोत्तम कामगिरी केलीय. त्यामुळे तो टीम इंडियासाठीही तिसऱया क्रमांकावर खेळू शकतो असेही त्याला वाटते.