हिंदुस्थानी क्रिकेटपटू ‘रेडी’,ऑस्ट्रेलिया दौरा गाजवण्यासाठी सज्ज

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 27 नोव्हेंबरपासून क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन देशांमध्ये चार कसोटी, तीन वन डे व तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या दौऱयासाठी हिंदुस्थानी क्रिकेटपटू आयपीएलनंतर थेट यूएईमधून ऑस्ट्रेलियाला रवाना झाले. आता टीम इंडियाची ब्रिगेड नेटमध्ये कसून सराव करताना दिसत आहे. रोहित शर्मा, इशांत शर्मा या दुखापतग्रस्त खेळाडूंसह गेल्या ऑस्ट्रेलियन दौऱयात धावांचा पाऊस पाडणारा चेतेश्वर पुजारा नेटमध्ये घाम गाळताना दिसले.

तो फिट होतोय
हिंदुस्थानचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा फिट होण्याच्या मार्गावर आहे. त्याने राष्ट्रीय क्रिकेट अॅकॅडमीत बुधवारी दोन गोलंदाजी सेशनचा सराव केला. एक सेशन 45 मिनिटांचे होते. निवड समितीचे सुनील जोशी व राष्ट्रीय क्रिकेट अॅपॅडमीचे राहुल द्रविड हे यावेळी उपस्थित होते.

मार्च महिन्यानंतर सराव
चेतेश्वर पुजारा क्रिकेटच्या मैदानात अखेरचा उतरला होता तो मार्च महिन्यात. त्यानंतर कोरोना व लॉकडाऊनमुळे त्याला घरीच राहावे लागले. आयपीएलमध्येही तो सहभागी नव्हता. त्यामुळे आता तो थेट ऑस्ट्रेलियन दौऱयात क्रिकेट खेळणार आहे. चेतेश्वर पुजाराने गुरुवारी उमेश यादव, रविचंद्रन अश्विन या प्रमुख गोलंदाजांसह इशान पोरेल व कार्तिक त्यागी यांच्या गोलंदाजीवर सराव केला.

रोहितच्या फिटनेस ट्रेनिंगला सुरुवात
रोहित शर्माने हॅमस्ट्रिंग इंज्युरीनंतरही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करीत जेतेपदही मिळवून दिले. मात्र त्यालावन डे व टी-20 मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आली. कसोटी मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आलीय. राष्ट्रीय क्रिकेट अॅपॅडमीत त्याने फिटनेस ट्रेनिंगला सुरुवात केली आहे. कसोटी मालिकेत कोहलीच्या अनुपस्थितीत रोहितच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या