हिंदुस्थानी हॉकीपटूंना मिळणार ५० हजारांचा मासिक भत्ता

34

सामना ऑनलाईन |नवी दिल्ली 

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक विभागाने लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम ( टॉप ) योजनेंतर्गत हिंदुस्थानी पुरुष हॉकी संघातील १८ सदस्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये मासिक भत्ता देण्यास मंजुरी दिली आहे.  मंत्रालयाने गेल्या वर्षांपासून टॉप्स योजनेतून क्रीडापटूंना असा भत्ता द्यायला सुरुवात केली होती.  हॉकीपटूंना मात्र हा लाभ प्रथमच मिळणार आहे. हॉकी प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानी संघाने आंतरराष्ट्रीय स्पर्धांत चमकदार कामगिरी केली आहे.  त्यामुळे हॉकीपटूंनाही टॉप्स योजनेत सहभागी करून घेण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या