
सामना ऑनलाईन | नवी दिल्ली
हिंदुस्थानी हॉकी संघाने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत उपविजेतेपद पटकावल्यावर संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. आता इंडोनेशियातील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्यासाठी सज्ज झालेल्या हिंदुस्थानच्या संघात अनुभवी “ड्रॅग फ्लिकर” रुपिंदर पाल सिंग आणि आक्रमक खेळाडू आकाशदीप सिंग यांनी पुनरागमन साजरे केले आहे. हॉकी इंडियाने सोमवारी दिल्लीत एशियाडच्या १८ सदस्यीय हॉकी संघाची घोषणा केली. इंडोनेशियात आपले सुवर्णपदक राखण्याचे आव्हान हिंदुस्थानपुढे आहे.
ब्रेडा,नेदरलँड येथील चॅम्पियन्स करंडक हॉकीत रौप्यपदक पटकावणाऱ्या हिंदुस्थानी संघात केवळ दोन बदल करण्यात आले आहेत. जर्मनप्रीत सिंगच्या जागी रुपिंदर तर जखमी रमणदीपच्या जागी आकाशदीप यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
एशियाडसाठीचा हिंदुस्थानी हॉकी संघ असा आहे.
गोलरक्षक – पी आर श्रीजेश (कर्णधार ) , क्रिशन बी पाठक
बचावपटू – हरमनप्रीतसिग , वरुणकुमार , वीरेंद्र लाकरा , सुरेंदरकुमार ,रुपिंदरपालसिंग , अमित रोहिदास .
मध्यरक्षक – मनप्रितसिंग , चिंगेलसानासिंग ( उपकर्णधार ) ,सिमरनजीतसिंग ,सरदारसिंग , विवेक सागर प्रसाद .
फॉरवर्ड्स – एस व्ही सुनील , आकाशदीपसिंग , ललित उपाध्याय ,दिलप्रीतसिंग.

























































