भीषण अपघातातून सावरतोय पवनदीप राजन

‘इंडियन आयडल’ फेम गायक पवनदीप राजनचा काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश येथे मोठा अपघात झाला होता. त्यानंतर त्याला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. आता पवनदीपच्या तब्येतीत सुधारणा असून हॉस्पिटलमधले त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पवनदीप राजन आता सोशल मीडियावरही सक्रिय झाला आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे, त्यामध्ये तो कर्मचाऱयांबरोबर बुद्धिबळ खेळताना दिसत आहे. तसेच त्याने हॉस्पिटलच्या बेडवरून गाणेही गायले. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.