
सामना ऑनलाईन । मुंबई
संपूर्ण हिंदुस्थानी बनावटीचे गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर ‘इंफाळ’ या अत्याधुनिक जहाजाचे शनिवारी नौदलाने माझगाव डॉक येथे जलावतरण केले. प्रोजेक्ट 15 ब्रेवोअंतर्गत बांधणी केलेल्या या जहाजाच्या जलावतरण सोहळ्याला नौदलप्रमुख ऍडमिरल सुनील लांबा, त्यांची पत्नी रीना लांबा यांच्यासह नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
‘इंफाळ’ हे प्रोजेक्ट 15 ब्रेवोमधील तिसरे जहाज असून याआधी ‘विशाखापट्टणम’ आणि ‘मुर्मागोवा’ या गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर जहाजांचे जलावतरण झाले आहे. 2021 पर्यंत ही तिन्ही जहाजे नौदलाच्या सेवेत येणार आहेत.


























































