हिंदुस्थानी नौदल स्पेनमध्ये ‘प्रोजेक्ट 75 भारत’ अंतर्गत अत्याधुनिक उपकरणांची चाचणी करत आहे. स्पेनची एक जहाज निर्माता (शिपयार्ड) कंपनी नवंतियानुसार या चाचणीनंतर हिंदुस्थानी नौदलात सहा अत्याधुनिक पाणबुडया दाखल होतील. नवंतियाचे अध्यक्ष रिकार्डो डोमिंगुज गार्सिया बाकुएरो यांच्या माहितीनुसार, स्पेनचे सरकार आणि नौदल पी 75 आय संबंधी खूप उत्सूक आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत हिंदुस्थानची मदत करायची आहे. या योजने अंतर्गत हिंदुस्थान सरकारसोबत एक करार केला जाईल.
जूनच्या अखेरपर्यंत या चाचणीला सुरुवात होईल. चाचणीसाठी लार्सन अँड टर्बो (एल अँड टी) कंपनीची मदत घेतली जाणार आहे. या टेक्नोलॉजी अंतर्गत पाणबुडी बराच काळ पाण्यात राहू शकते. हिंदुस्थानी नौदलाकडे याआधी एआयपी सिस्टमच्या पाणबुडया नव्हत्या. जवळपास 60 हजार कोटी रुपयांच्या या योजनेत नवंतिया सोबत जर्मनीची थिसेक्रूप मरिन सिस्टम आणि मुंबईच्या माझगाव डॉकयॉर्ड्स सहभागी असेल.