इंडियन ऑईलकडून इंधन पुरवठा सुरळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरातील सप्लाय चेनमधील अडचणींनंतर महाराष्ट्रात मे महिन्यात इंधनाची मोठय़ा प्रमाणात अधिक मागणी होऊनही इंडियन ऑईलने इंधन पुरवठा सुरळीत ठेवला आहे. इंडियन ऑईलने महाराष्ट्रातील सर्व आऊटलेटवर नियोजनबद्ध कार्यप्रणाली आणि प्रभावी लॉजिस्टिकचा समन्वय राखत प्रत्येक ग्राहकाला दररोज पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा सुरळीत व अखंड पुरवठा सुनिश्चित केल्याचा दावा कंपनीने केला.