परिवर्तनाची झेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nlc-bharat

>> डॉ. संजय मालपाणी

देशाच्या विकासात राज्यकर्त्याचे धोरण आणि दृष्टी अधिक महत्वाची असते. त्या दृष्टिने राष्ट्रीय विधायक संमेलन राजकिय मतभेद विसरत राष्ट्र विकासासाठी निश्चित दिशादर्शक ठरणार आहे. राजकारणाच्या पलिकडे दृष्टी विशाल करण्याची आणि संवाद सुरू करण्याची नितांत गरज असतांना राहुल कराड यांनी असे समेलन आयोजन करून विकासाच्या स्वप्नांच पेरणी केली आहे.

देशातील विविध राज्यातील विधानसभा, विधानपरिषद व राष्ट्रीय लोकसभा, राज्यसभेच्या सदस्याचे पहिलेच राष्ट्रीय विधायक संमेलन जून महिन्यात आयोजित करण्यात आले आहे. देशपातळीवर अशा स्वरूपाचे संमेलनाचे आयोजन एक शैक्षणिक संस्था करते आहे हे अधिक विशेष आहे. खरेतर कोणतेही सरकार असे संमेलन आयोजित करू शकले असते मात्र त्यापेक्षा शिक्षण संस्थेने आयोजित करणे हे अधिक महत्वाचे आहे. देशाच्या विकासात राज्यकर्त्यांचे धोरण आणि दृष्टी अधिक महत्वाची असते. जगाच्या पाठीवर अनेक राष्ट्रांनी विकासाची भरारी घेतली त्यामागे त्या देशातील नेतृत्व करणारे जी माणसं आहेत त्यांची स्वप्ने आहेत. त्यांनी जी काही स्वप्न पाहिले आहेत आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. अशा विकासाभिमुख आणि सर्जनशील नेतृत्वाने एकत्रित येऊन विचाराची देवाणघेवाण करत सुसंवाद सुरू केला तर भारतासाठी प्रगतीच्या वाटा अधिक रुंदावत जाणार आहे. त्यामुळे या संमेलनाच्या निमित्ताने धोरणकर्ते एकत्रित येणे आणि विचाराची देवाणघेवाण होणे व विकासाच्या स्वप्नाची पेरणी करणे यासाठी हे संमेलन अधिक महत्वाचे ठरेल. लोकशाही व्यवस्थेत परस्पर सुसंवाद हीच महत्वाची वाट आहेत. या संमेलनाच्या निमित्ताने राजकिय मतभेद विसरत राष्ट्र विकासासाठी हे संमेलन निश्चित दिशादर्शक ठरणार आहे.

आपल्याला देशात पुन्हा एकदा स्वातंत्र्यासाठीचे समर सुरू असताना ज्या पध्दतीने राष्ट्रीय भावना निर्माण झाली होती ती भावना दिवसेदिवस कमी होते आहे का ? असा प्रश्न पडावा अशी परीस्थिती आहे. अशा परीस्थितीत आपल्या समोर आजही अनेक आव्हाने आहेत. ते पेलण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी राजकारणाच्या पलिकडे दृष्टी विशाल करण्याची आणि संवाद सुरू करण्याची नितांत गरज आहे. माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दूल कलाम म्हणाले होते, की वर्तमानात आपल्याला अधिक गरज आहे ती राष्ट्र विकासासाठी विविध राजकीय पक्षांमध्ये परस्परांशी सहकार्य करत वाट चालण्याची. राजकीय नेतृत्वामध्ये परस्परांमध्ये संवाद सुरू झाल्यास विकासाचे चित्र बदलू शकते. ही बाब लक्षात घेता देशातील सर्व पक्षांच्या आणि राज्यांच्या आमदार, खासदारांमधीस संवादाच्या प्रक्रियेने देशातील विकासाच्या प्रक्रियेला दिशा आणि गती मिळण्यास निश्चित लाभ होणार आहे. विकसित भारताचे स्वप्न आपण गेले काही वर्ष सातत्याने पाहातो आहोत. त्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न केले जाता आहेत. २०२० साली आपला भारत जागतिक महासत्ता होईल असे म्हटले होते, मात्र त्यात यश आले नाही हे सत्य आहे. याचा अर्थ आपण आजवर त्या दिशेने जाण्यासाठीचे कोणतेच प्रयत्न केले नाहीत असे नाही. आपल्याला त्या दिशेने जाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कामे करणारी माणसं आपल्या भोवती आहे, असे सर्जनशील नेतृत्व आपल्याभोवती ठिकठिकाणी कामे करता आहेत. ही प्रकाशाची बेटे आहेत. ती प्रकाशाचे बेटे निर्माण करणा-या या सृजनशील नेतृत्वाचा संवाद सुरू करण्याची गरज होती. तो संवाद या निमित्ताने झाल्यास विकासाचा एक प्रकाशमान सूर्य निर्माण करणे करणे आता शक्य होणार आहे..

आपल्या देशातील लोकसंख्येचा विचार करता ७० कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या ही तरुणांची आहे. अशा तरुणांच्या शक्तीचा उपयोग करत आपल्याला भारतात परिवर्तन करायचे असेल तर त्याकरीता तरुणांना दिशा देण्यासाठी सृजनशील नेतृत्वाची नितांत गरज आहे. जो इतरांसाठी काही करू शकेल याचा विचार करणारी व्यक्ती ही खरे नेतृत्व असते. खरेतर नेतृत्व करणारी व्यक्ती ही विविध गुणांनी युक्त असावी लागते. अशी माणसं आपल्या भोवती आहेत. अशी माणसं आपापल्या परीने आपापल्या मतदार संघात काम करत असतात. ही माणसं आता एकमेकाला भेटल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली घडलेल्या परिवर्तनाची ‘

लस इतरांना दृष्टी देणारी ठरेल. शेवटी कोणीतरी विचारांची केलेली पेरणीने जे काही साध्य झाले आहे ते इतरत्र उगवले आणि संपूर्ण भारताचा कायापालट होण्यास फार वेळ लागण्याची शक्यता नाही. नेतृत्व करणारी ही माणसं आपण जेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांच्यामध्ये काही गुणांचा समावेश असतो. कोणतेही नेतृत्व हे नेहमी प्रामाणिक, आशावादी, सहकार्य, प्रेरक, एकत्रीत काम करण्याची वृत्ती, निर्णयक्षमता, दूरदर्शीपणा, दृढनिश्चयी समस्यांची उकल करण्याची क्षमता असणारे, धैर्य अशा विविध गुणांनी युक्त असते ज्या देशात सर्जनशील नेतृत्वाचे प्रमाण जितके अधिक असेल तितक्या प्रमाणात त्या देशाची विकासाची वाट अधिक समृध्द होत जाते. या निमित्ताने होणारे विचारमंथन निश्चित स्वप्न पेरणारे ठरेल आज स्वप्न पेरणे देखील महत्वाचे आहे. या संमेलनात भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी सहभागी होता आहेत. प्रत्येक नेतृत्व आपल्या देशाला कसे पुढे नेते या निमित्ताने जाणता येणार आहे. ही पेरणी मनामनात झाली तर परिवर्तनाची वाट चालणे सहज शक्य आहे. या संमेलनात सहभागी होणा-या नेतृत्वाने आपल्या देशात, राज्यात परिवर्तन घडविण्यासाठी कितीतरी कष्ट उपसले आहे. त्यांच्या प्रयत्नाने परिवर्तनाची झेप घेतली आहे. त्या वाटा एकमेकाला जाणता येणार आहे. हे संमेलन स्वप्न पेरणारं ठरेल यात शंका नाही. त्यामुळे ती वाट चालण्यासाठी अनेकांच्या मस्तकी बळ भरण्याबरोबर हृदये देखील प्रेमाने भरण्यास मदत होणार आहे. खरेतर नेतृत्वाने मोठीच स्वप्न पाहायची असतात. जेथे सामान्य माणसांची दृष्टी पोहचत नाही अशा ठिकाणी नेतृत्वाची दृष्टी पोहचवायची असते. अनेकदा अशक्य वाटणारी कामे देखील संवादाने सहज घडतात. त्यामुळे नेतृत्वाला अशी आव्हाने नवी नसतात मात्र ती पेलत त्यावर मात करणे शक्य आहे. त्याच बरोबर जेव्हा असा संवाद होतो तेव्हा चौकटीबाहेर जात सर्जनशीलतेने प्रवास घडवायचा असतो. त्याचवेळी सतत काम करावे लागते. तसेच जग बदलण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आजवर प्रयत्न केले असे अनेक नेते या निमित्ताने भेटणार आहेत. अनेक ज्ञानवंत, प्रज्ञावंत नेत्यांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. ऐकणे हा नेतृत्वाचा गुण आहे. त्यामुळे या निमित्ताने ज्यांनी ज्यांनी परिवर्तनासाठी पावले टाकली आहेत अशा माणसांचा सहवास आणि संवाद निश्चित परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी हे संमेलन दिशादर्शक ठरणार आहे.

शिक्षण संस्था संमेलने घेत असल्याने विद्यार्थ्यांना देखील या निमित्ताने बरेच काही शिकायला मिळणार आहे. इतक्या लहान वयात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नेतृत्वाच्या विचारांची ओळख होणार आहे. त्यांच्या सोबतचा संवादही त्यांच्या मनात अनेक उज्ज्वलतेची बीजे पेरणार आहे. त्यांसाठी हा भाग्याचा क्षण आणि त्याचवेळी बरेच काही शिकविणारी परिषद ठरणार आहे अशी अपेक्षा आहे. परिषदेने सुरू केलेला संवाद भारताच्या प्रगतीची दिशेने झेप घेण्यासाठी बळ देईल अशी अपेक्षा आहे.