
भारतीय टपाल खाते सुपरफास्ट झाले आहे. कुरिअर किंवा पार्सल अगदी पुढच्या दिवशी पोचेल, अशी सेवा सुरू करण्यात आली आहे.
24 स्पीड पोस्ट ः तातडीच्या कंसाइनमेंटसाठी पुढील दिवशी डिलिव्हरीची हमी.
24 स्पीड पोस्ट पार्सल ः पुढील दिवशी पार्सल डिलिव्हरीची हमी.
48 स्पीड पोस्ट ः यात दोन दिवसांत डिलिव्हरी केली जाईल.
पहिल्या टप्प्यात ही सेवा मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद या देशातील सहा मेट्रो शहरांमध्ये सुरू होईल.
वन-डे मेलमध्ये एसएमएस अलर्टसह ट्रकिंगची सुविधा असेल. डिलिव्हरीला उशीर झाल्यास मनी-बॅक गॅरंटी मिळेल.





























































