
IPL 2022 च्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयपीएलचे सामने 26 मार्च 2022 पासून सुरू होणार आहे. तर 29 मे रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या गवर्निंग काउन्सिलच्या गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आले आहे. आयपीएल गवर्निंग काउन्सिलने टाटा आयपीएल 2022 सिजनबाबतची काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
आयपीएल 2022 च्या सिजनमध्ये मुंबई आणि पुण्यातील चार ठिकाणी एकूण 70 लीग सामने खेळवण्यात येणार आहेत. तर प्ले ऑफ सामन्यांच्या ठिकाणांबाबत नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. 2011 प्रमाणे यंदाही 10 संघ सामन्यात खेळणार असून त्यांचे दोन गट करण्यात आले आहे. ग्रुप ए मध्ये मुंबई इंडियन्स, कोलकात नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायन्टस् हे संघ असतील. तर बी ग्रुपमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, सनराईज हौदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि गुजरात टाइन्टस हे संघ असतील.
या दोन गटातील संघाना गटातील संघाशी सामने खेळायचे आहेत. तर ए गटातील प्रत्येक संघला बी गटातील संघातील एकएक सामने खेळायचे आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 20, ब्रेबॉर्न स्टेडियमवर 15, डी. वाय, स्टेडियमवर 20 आणि पुण्यातील एमसीए इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर 15 सामने होणार आहेत. सर्व संघ वानखेडे, डी.वाय. पाटील स्टेडियमवर 4-4 सामने खेळणार आहेत. तर ब्रेबॉर्न आणि पुण्यातील एमसीए स्टेडियमवर 3-3 सामने होणार आहेत.