
आयपीएलच्या पुढच्या मोसमात (2021) नव्या संघाचा समावेश करण्याण्यासाठी बीसीसीआय प्रयत्न करीत आहे. याबाबतचे वृत्त मीडियामधून पुढे आले आहे.
प्रत्यक्षात आयपीएलमध्ये नव्या अर्थातच नवव्या संघाचा समावेश होणार का, या प्रश्नाचे उत्तर डिसेंबरच्या उत्तरार्धात मिळण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण बैठक डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. या बैठकीत नव्या फ्रेंचायझीबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.
तसेच आयपीएल लिलाव आणि स्थानिक मोसमातील स्पर्धा याबाबतही या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.

























































