उरणच्या पोल्ट्री फार्ममध्ये घुसला 25 किलो वजनाचा अजगर, सर्पमित्रांनी सोडले  जंगलात

871

उरण तालुक्यातील एका पोल्ट्री फार्ममध्ये मोठा अजगर घुसला होता. तेव्हा सर्पमित्रांनी या अजगराला पकडून जंगलात सुखरूप सोडून दिले.

चिरनेर येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये एक भला मोठा अजगर भक्ष्याच्या शोधासाठी घुसला होता. इंडियन रॉक पायथॉन जातीचा हा अजगर  आठ फुटी लांब आणि 25 किलो वजनाचा होता. पोल्ट्री फार्म मध्ये हा अजगर घुसल्यानंटर कोंबड्यांचा जोरजोरात आवाज आला. हा आवाज ऐकून पोल्ट्री फार्मच्या मालकाने पोल्ट्रीत धाव घेतली. तेव्हा त्यांनाहा अजगर निदर्शनास आला. तेव्हा मालकांनी सर्पमित्र विवेक केली यांना पाचारण केले. विवेक केली आणि त्यांच्या मित्रांनी या अजगराला पकडून सुरक्षित जंगलात सोडून दिले.

आपली प्रतिक्रिया द्या