
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर आज आंतरबँक परकीय चलन बाजारात हिंदुस्थानी रुपयामध्ये किंचित घसरण पाहायला मिळाली. दिवसभराच्या चढ-उतारानंतर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया २ पैशांनी घसरून ९५.७६ या पातळीवर बंद झाला.
परकीय चलन बाजारात व्यवहाराच्या सुरुवातीला रुपया डॉलरच्या तुलनेत ९५.७३ वर उघडला होता. दिवसभरात रुपयाने ९५.७१ या उच्चांकी तर ९५.८० या नीचांकी पातळीला स्पर्श केला. अखेर बाजार बंद होताना रुपया २ पैशांच्या घसरणीसह ९५.७६ वर स्थिरावला. यापूर्वीच्या सत्रात रुपया ९५.७४ प्रति डॉलरवर बंद झाला होता.


























































