
भारतीय शेअर बाजार आज बुधवारी सलग दुसऱया दिवशी उसळला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 700 अंकांनी वधारून 82,755 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 200 अंकांनी वाढून 25,244 अंकांवर बंद झाला. बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन वाढून 453.96 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. याचाच अर्थ गुंतवणूकदारांनी 2.46 लाख कोटी रुपयांची कमाई केलीय.