शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 7.57 लाख कोटी स्वाहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी शेअर बाजारात गुरुवारी अक्षरशः हाहाकार उडाला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1236 अंकांनी घसरून 82,498 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 365 अंकांनी घसरून 25,500 अंकांवर बंद झाला. बाजार घसरल्यामुळे गुंतवणूकदारांना तब्बल 7.57 लाख कोटी रुपयांना फटका बसला आहे. बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केंट कॅपिटलायझेशन आज घसरून 464.46 लाख कोटींवर आले. काल ते 472.01 लाख कोटी रुपयांवर होते. शेअर बाजार घसरण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिका आणि इराणमध्ये वाढलेला तणाव आहे.