ISPL Season 3 – टेनिस बॉल टी-10 स्पर्धेचे बिगुल वाजले, सर्वोत्तम खेळाडूला नवी कोरी Porche 911 मिळणार; जाणून घ्या सर्व माहिती

इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. 9 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2026 या कालावधीत गुजरातच्या सुरतमध्ये ही स्पर्धा खेळली जाणार आहे. आठ संघांमध्ये रंगणार द्वंद्व आणि चौकार-षटकारांची आतषबाजी पाहण्यासाठी चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. तिसऱ्या हंगामाच सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला (MVP) एक नवी कोरी Porche 911 मिळणार आहे. आयएसपीएलच्या कोअर कमिटी सदस्यांनी पत्रकार परिषदेत अशी घोषणा केली आहे.

दोन यशस्वी हंगामानंतर ISPL चा तिसरा हंगाम गाजवण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली आहे. तसेच तिसऱ्या हंगामात सलमान खान आणि अजय देवगण यांचे संघ सुद्धा पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे तिसऱ्या हंगामात आठ संघाचा समावेश असणार आहे. ही स्पर्धा 9 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2025 दरम्यान सुरतमध्ये खेळली जाणार आहे. प्रत्येक संघामध्ये 18 खेळाडूंचा समावेश आणि दोन 19 वर्षांखालील खेळाडूंचा समावेश अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर संघाच्या पर्समध्ये 50 टक्के वाढ करण्यात आली आहे. तिसऱ्या हंगामाच्या चाचण्या 5 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होतील आणि 101 शहरांमध्ये होतील.