
एका हिंदुस्थानी महिलेनी परदेशात आपल्या पारंपरिक वेशभूषेमुळे लोकांची मने जिंकली आणि रशियाच्या रस्त्यांवर अक्षरशः स्टार असल्याचे अनुभवले. तिचा पोशाख, तिचे चालणे आणि हसणे या साऱ्यावर रशियन लोक फिदा झाले. हा व्हिडीओ शुभम गौतमने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची आई रशियामध्ये फिरताना दिसत आहे. पारंपरिक राजस्थानी पोशाख घातलेली त्यांची आई अचानक परदेशी लोकांचे लक्ष वेधून घेते आणि ती एखादी सेलिब्रिटी असल्यासारखे तिच्याशी वागतात. काही जण तिच्याकडे येऊन सेल्फी मागतात, काही जण कौतुकाने हात जोडतात. यावर शुभमने मजेदार कॅप्शनसह लिहिले, ‘ती फक्त माझी आई नाही, तर ती रशियाची एक सेलिब्रिटीदेखील आहे!’



























































