सलग 12 दिवसांपासून 60 हजाराहून अधिकने वाढतोय कोरोनाग्रस्तांचा आकडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या 24 तासात देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 64,531 ने वाढला असून मृतांचा आकडा पहिल्यांदाच एक हजाराच्या पुढे गेला आहे. मंगळवारी देशभरात 1092 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर हिंदुस्थानात गेल्या 24 तासात तब्बल 9 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या 27,67,274 कोरोनाग्रस्त असून त्यातील 6,76,514 कोरोनाग्रस्त अॅक्टिव्ह असून 20,37,870 रुग्ण बरे झाले आहेत. देशातील मृतांचा आकडा देखील 52,889 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण म्हणजेच 57,584 रुग्ण बरे झाले आहेत.