
कोलकाता विमानतळावर मंगळवारी विमानतळ टर्मिनलच्या भागात उभे असलेल्या इंडिगोच्या विमानाला एका मानवरहित वाहनाने धडक दिली. या घटनेनंतर विमान कंपनीने तपासणीसाठी विमानाची उड्डाणे तात्पुरती थांबवली आहेत, अशी माहिती कंपनीने दिली.
इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘७ एप्रिल २०२६ रोजी कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर एप्रनवरील एका मानवरहित वाहनाने तिथे उभ्या असलेल्या इंडिगो विमानाला धडक दिली. याप्रकरणी संबंधित प्राधिकरणांना कळवण्यात आले आहे’.
विमान सध्या जागीच उभे असून, पुन्हा सेवेत दाखल करण्यापूर्वी त्याची सखोल तपासणी आणि आवश्यक देखभाल केली जात आहे, असेही प्रवक्त्याने पुढे स्पष्ट केल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.



























































