
गेल्या नऊ दिवसांपासून विमान प्रवाशांना अक्षरशः मेटाकुटीला आणणाऱया ‘इंडिगो’वर मोठी कारवाई करण्यात आली आहे. इंडिगोच्या एकूण उड्डाणांमध्ये 5 टक्के कपात करण्यात आली आहे. ही कपात सर्वाधिक सेवा असलेल्या मार्गांवर करण्यात आली आहे. हे मार्ग आता इतर विमान कंपन्यांना देण्यात येतील. याशिवाय सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुण्यासह देशातील 10 प्रमुख विमानतळांवर वरिष्ठ सनदी अधिकाऱयांना नियुक्त करण्यात आले आहे. प्रवाशांना नेमका काय त्रास होत आहे आणि उद्भवलेल्या परिस्थितीचा हे अधिकारी तपास करणार आहेत.


























































