
इंडिगो एअर लाइन्सच्या स्टाफने आज अचानक संप पुकारल्याने सेवा कोलमडल्याचा प्रकार समोर आला आहे. संपामुळे अनेक विमानांचे उड्डाणे खोळंबल्याने शेकडो प्रवाशांची गर्दी या ठिकाणी उसळली. कॅबिन क्रू आणि स्टाफच्या मॅनेजमेंटमध्ये वाद झाल्याने हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे. शिफ्ट वाटप आणि डयुटी तासांबाबत मॅनेजमेंट सोबत सुरू असलेल्या वादातून आंदोलन पेटले. मुंबईसह नाशिकमध्येही एअर इंडियाचे कर्मचारी रजेवर गेल्याने या ठिकाणीही विमानसेवा विस्कळीत झाली. नाशिक विमानतळावरून सायंकाळी सुटणारी विमाने रद्द करण्यात आली तर इतर विमानांनी नियोजित वेळेपेक्षा विलंबाने उड्डाण केल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.





























































