उल्काच्या तुकड्याने मिळवून दिले 14 हजार डॉलर

भर दुपारची वेळ होती आणि अचानक त्यांच्या अंगणात काहीतरी पडल्याचा आवाज झाला. आवजाच्या दिशेने त्याने धाव घेतली असता दीड ते 2 किलो ग्रामच्या एका तुकड्याने जमिनीला खड्डा पाडला होता. या अजब वस्तूचा शोध घेतल्यावर त्यांना कळाले की, लाखो किलोमीटरवरून अंतराळातून आलेला हा उल्केचा तुकडा आहे. या तुकड्यानेच इंडोनेशियातील एका सुतारकाम करणाऱ्या व्यक्तीला 14 हजार डॉलर मिळवून दिले.

कोलांग जिल्ह्यातील तापानौली या ठिकाणी जोशुआ हे आपल्या घराजवळ सुतारकाम करत होते आणि अचानक त्यांच्या अंगणात हा उल्केचा गरम गोळा धडकला. ऑगस्ट महिन्याची ही घटना. या गोळ्याविषयी त्यांना उत्सुकता वाटू लागली त्यांनी माहिती गोळा करण्यास सुरूवात केली. मॅक्सिकोपर्यंत त्यांनी शोधकार्य सुरू केले. तेव्हा त्यांना कळाले की हा उल्केचा तुकडा आहे. ज्याचे वजन साधारण 2 किलो ग्रामपेक्षा अधिक होते.

या शोधकार्यासाठी त्यांनी सोशल मिडीयाचा आधार घेतला. तेव्हा जॅरेड कॉलिस या अमेरिकेतील एका खगोलअभ्यासकाने त्यांच्याशी संपर्क साधला. कॉलिस अमेरिकेतून इंडोनेशियात गेले तेव्हा त्या तुकड्याचा अभ्यास केला असता तो तुकडा साडेचार अरब वर्षापूर्वींचा असल्याचे समोर आले. कॉलिसने जोशुआला 14 हजार डॉलर्सची ऑफर केली. कॉलिस अमेरिकेत आल्यावर त्याने हा तुकडा दुसNया व्यक्तीला विकला. सध्या हा उल्केचा तुकडा एरिजोना स्टेट युनिव्हर्सिटीत  ठेवण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या