‘त्याने’ 26 फुटी अजगर मारला, गावकऱ्यांनी तळून खाल्ला

इंडोनेशियातील सुमात्राच्या बतांग गनसाल जिल्ह्यात काम करणाऱ्या रॉबर्ट नबाबन नावाच्या सुरक्षा रक्षकाने 26 फुटी अजगराला ठार मारला. बराच वेळ चाललेल्या झटापटीनंतर त्याला अजगराला ठार मारण्यात यश आले. अजगराशी झालेल्या संघर्षात रॉबर्टच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली, मात्र अजगराला ठार करुन ग्रामस्थांचे रक्षण करण्यात यशस्वी झाल्यामुळे तो स्थानिकांचा हिरो झाला.

Video – अजगराच्या विळख्यातून हे हरीण बचावले असेल ?

ग्रामस्थांना 26 फुटी अजगर बघता यावा यासाठी त्याने ठार केलेला अजगर एका झाडावर टांगून ठेवला होता. नंतर ग्रामस्थांनी भाजून आणि तळून अजगरावर यथेच्छ ताव मारला. गनसाल जिल्ह्यात अनेकदा मोठाले अजगर आढळून येतात.  उकाडा वाढल्यानंतर पाण्याच्या शोधासाठी हे महाकाय अजगर बाहेर पडतात आणि नकळतपणे निवासी वस्तीत प्रवेश करतात, असे स्थानिकांनी सांगितले. ‘पाम’ची शेती होत असल्यामुळे गनसाल जिल्ह्यात उंदरांचा सुळसुळाट आहे. या उंदरांना खाण्यासाठीही काहीवेला हे महाकाय अजगर बाहेर पडतात.

Video – अजगरासारखी दिसणारी पाल बघितली का ?

रॉबर्ट नबाबन याला 26 फुटी अजगर लागवडीचे काम सुरू असताना रस्त्यावर दिसला होता. अजगर रस्त्यावर आल्याने ग्रामस्थ घाबरले होते. अखेर 37 वर्षांच्या रॉबर्टने धाडस केले आणि अजगराला ठार मारायला निघाला. अजगराला ठार मारत असताना रॉबर्टच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. रॉबर्टने त्याही परिस्थितीत अजगराचे दात उपटले आणि त्याला ठार मारला.

आपली प्रतिक्रिया द्या