लग्नाआधी शारिरीक संबंध तसेच लैंगिक संबंध ठेवल्यास तुरुंगवास

3695

लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवल्यास तसेच समलैंगिक संबंध ठेवल्यास तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्याचा कायदा सध्या इंडोनेशिया सरकार बनविण्याच्या तयारीत आहे. या कायद्याला सध्या तेथील जनता विरोध करत आहे. त्यामुळे इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो ने सध्या हा कायदा अमलात न आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र काही काळाने सरकार पुन्हा विचार करून या कायद्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या व समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी इंडोनेशिया सरकार कायदा बनविणार होता. या कायद्यासंबंधिचे विधेयक लवकरच संसंदेत मांडण्यात येणार होते व त्याला मंजूरी मिळवून तो कायदा देशभरात लागू केला जाणार होता. मात्र त्या कायद्याला जनतेकडून मोठ्या प्रमाणातच विरोध केला जात होता. तसेच इंडोनेशियाला अनेक अविवाहीत जोडपी फिरण्यासाठी येतात. या कायद्यामुळे पर्यटकांमध्ये देखील घट होईल. म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी या कायद्याबाबत पुन्हा विचार करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या